Visitors: 226977
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा असे शिक्षण विभागाचे आवाहन

  team jeevandeep      05/05/2025      sthanik-batmya    Share


शिक्षण माध्यमिक विभागातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा असे शिक्षण विभागाचे आवाहन

दि. २ मे (जिल्हा परिषद, ठाणे) – 

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता अनधिकृतरीत्या शिक्षण संस्था चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता व नोंदणी क्रमांक तपासावा, असे आवाहन शिक्षण विभाग (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक अनधिकृत शाळांची यादी

१. आर.एन.इंग्लिश स्कुल, सर्वे क्र.116/16,17 मौजे कोनगाव, ता.भिवडी, जि.ठाणे

२. इंग्लिश प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक स्कुल नवी वस्ती टेमघर ता.भिवंडी

३. फकिह इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, म्युनिसिपल हाऊस क्र.1008/0, न्यु गौरीपाडा, भिवंडी, जि.ठाणे

४. एस.एस.इंडिया हायस्कुल दिवा (पुर्व)

५. श्री. विदया ज्योती स्कूल, डावले, ठाणे

६. केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे

७. एस.एस. इंग्लिश हायस्कूल, ईश्वरपार्क, मुंब्रादेवी मेडीकल जवळ, मुंब्रादेवी रोड, दिवा (पूर्व)

८. ओमसाई इंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे

९. पी.टी.आर.एस.डी.इंग्लिश स्कुल सर्व्हे नं. 56 बल्याणी टिटवाळा ता.कल्याण

१०. चेतना हिंदी विद्यामंदिर, कल्याण (पू.), चक्की नाका, हाजी मलंग रोड, कल्याण (पू.), जि.ठाणे

११. ओम साई इंग्लिश स्कुल पिसवली

१२. रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कॉसमॉस आर्केड, फेज-4, टीएमसी वॉटरटँकजवळ, ब्रम्हानंद, ठाणे (प.), जि.ठाणे - 400 607

१३. शारदा इंग्रजी माध्यमिक शाळा 

१४. डी.आर.पाटील इंग्लिश मेडियम स्कुल तुर्भे नवी मुंबई

१५. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई

१६. ओईएस इंटरनॅशनल स्कुल सेक्टर 12 वाशी नवी मुंबई

          या शाळांकडे माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक शासकीय मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनुचित असून, भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी सजग राहावे.

        शासनमान्य शाळांची यादी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. पालकांनी कोणत्याही प्रवेशापूर्वी अधिकृत शाळांची माहिती तपासून निर्णय घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

+