Team Jeevandeep 10/06/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौक परिसरात सोमवारी सकाळी केडीएमसीची पाण्याची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेमुळे गेले दोन दिवस कल्याण पश्चिमेत पाणी बाणी समस्या निर्माण झाल्याने पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिला वर्गावर आली.
कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौकात सिमेंट काँक्रीट रस्त्याखालील साडे पाचशे एमएम व्यासाची पाण्याची लाईन फुटल्याची घटना सोमवारी सकाळी घडल्याने कल्याण पश्चिमेतील पाणी पुरवठा न झाल्याने दोन दिवस पाणी बाणी समस्या निर्माण झाली. वटपौर्णिमा महिलांच्या सणाच्या दिवसाला पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. कल्याण पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रस्त झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
कल्याण पश्चिमेतील महमंद अली चौक परिसरात काँक्रीटच्या रस्त्या खालील पाईपलाईन फुटली असून केडीएमसी पाणी पुरवठा विभागाकडून युध्द पातळीवर दुरूस्तीचे काम सुरू असून मंगळवारी रात्री नऊ वाजेपर्यंत दुरूस्ती काम पूर्ण होईल. रात्री अकरा वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली.