Visitors: 229959
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

नेने महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

  team jeevandeep      02/03/2025      sthanik-batmya    Share


पेण (प्रतिनिधी) भाऊसाहेब नेने महाविद्यालयात पेण येथे मोठ्या उत्साहाने “ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करुन  विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी प्रास्ताविक व मनोगतात अनेक संशोधनांचा उल्लेख केला.   सायन्स असोसिएशनचे चेअरमन डॉ. एस. आर. कान्हेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सि. व्ही. रमण यांना रमण इफेक्ट या संशोधनाबाबत नोबेल पारितोषिक २८ फेब्रुवारी १९२८ ला मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ १९८६ पासून आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ ची थीम “एम्पावरमेंट‌ ऑफ युथ “ही असून विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची आजपर्यंत झालेली प्रगती, विविध नवीन नवीन शोधांची माहीती व्हावी व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी   महत्त्वाचे असल्याचे सांगितले .विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले.यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.  आशुतोष अविनाश देव (प्रथम) गुंजन शशीशेखर ठाकुर - (द्वितीय), हर्षल पाटीलने( तृतीय) पटकावला तर अंजली अतुल वारंग हीला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेते विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांकडून रोख रक्कम व प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले. विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ. सायली पितळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. परिक्षक म्हणून प्रा. डॉ.विनोद भाबड व प्रा. बि.एम. शिकारे  यांनी काम पाहिले. वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापिका सौ. वैदेही जोशी यांनी “वनस्पतींचा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व“ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. 

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. एस. डी. लकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

+