Visitors: 391479
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

नारिवली ग्रामपंचायतच्या सरपंच पदी योगेश भोईर यांची निवड!

  team jeevandeep      29/03/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड-प्रतिनिधी :

मुरबाड तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या नारिवली ग्रामपंचायती च्या रिक्त असलेल्या सरपंच पदी नवयुवक योगेश भाऊ भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. योगेश भोईर हा एक सामान्य कुटुंबातील सुशिक्षित तरूण असून त्यांचे माता पित्याचे छत्र हरपले असताना सुद्धा  आपल्या गावासाठी काम करण्याची त्यांची लहानपणापासून ईच्छा होती.मागिल निवडणूकीत गावाने त्यांना सदस्य म्हणून निवडून दिले होते तर आज त्यांची संपूर्ण गृप ग्रामपंचायतीने बिनविरोध सरपंच करून त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. लहानपणापासून त्यांच्यावर तालुक्याचे माजी सभापती व बँकेचे संचालक उल्हासभाऊ बांगर यांचा राजकीय सहवास लाभला असून यापुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गावासाठी विकास कामे करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीमुळे उल्हास बांगर यांच्या सह नारिवलीच्या माजी सरपंच हर्षला भोईर, अर्चना भोईर, भास्कर बांगर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर यावेळी नवनिर्वाचित सरपंचांनी सर्व सदस्यांचे , ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

+