Visitors: 229008
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन

  team jeevandeep      01/04/2025      sthanik-batmya    Share


दि. 01 (जिल्हा परिषद, ठाणे) - सध्या राज्यामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले असून दिवसा काम करताना अनेक लोकांना अति उष्णतेमुळे त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पारा हा नॉर्मल तापमानापेक्षा वाढला असून त्याचा त्रास लोकांना जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी लोकांना उष्माघातापासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी लोकांना उष्माघाताची लक्षणे ओळखावीत व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यामध्ये सतत पाणी पिणे आवश्यक असून कडक उन्हामध्ये गरज असल्यासच घरातून बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  

उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल?

कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. 

अनवाणी बाहेर जाऊ नका. 

लहान मुले किंवा पाळीव प्राणी यांना उन्हात पार्क केलेल्या गाडीत सोडू नका. 

दुपारच्या वेळेस बाहेर काम करण शक्यतो टाळा. 

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. 

सैल सूती कपडे घाला. 

चहा, कॉफी, दारू पिणे टाळा. 

कडक उन्हाच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा.

ओरल रिहायड्रेशन सोलूशन वापरा. लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे.

डोके झाकून ठेवा- थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल, यासारख्या पारंपारिक साधनांचा वापर करावा.  

जेष्ठ नागरिकांमध्ये उष्माघाताची लक्षणे  

दिशाहीनता, भ्रम, गोंधळ, चिडचिड, झटका येणे किंवा कोमात जाणे. 

गरम लाल, कोरडी त्वचा. 

मुख्य शरीराचे तापमान ४० डिग्री से. पेक्षा अधिक किंवा १०४ डिग्री एफ. 

स्नायू कमकुवत किंवा पेटके आल्यासारखे वाटणे. 

मळमळ किंवा उलटी होणे. 

हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, श्वास लागणे. 

मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे  

भूक न लागणे, अत्याधिक चिडचिड होणे. 

लघवी ला कमी होणे. 

डोळ्यासमोर अंधुकपणा जाणवणे.

सुस्ती, मानसिक भ्रम सारखी परिस्थिती   

झटका येणे. 

कोणत्याही ठिकाणावरून रक्त वाहने.    

संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी 

             लहान अर्भक, लहान मुले, गर्भवती महिला, घराबाहेर काम करणाऱ्या व्यक्ती, ज्यांना मानसिक आजार आहे आशा व्यक्ती, शारीरिक दृष्ट्या आजारी, विशेषतः उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींची जास्त काळजी घेण गरजेच आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसांत लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी 

एकटे राहणाऱ्या वयोरुद्ध व्यक्ती किंवा आजारी लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवा. 

शरिराला थंडावा देण्यासाठी पंखे आणि ओल्या कपड्यांचा वापर करावा. 

घरातील वातावरण थंड असावे.  

            घराबाहेर आणि घरामध्ये अतिउष्णतेच्या संपर्कामुळे हिटस्ट्रेस निर्माण होवू शकतो. ज्यामुळे उष्माघाताशी संबंधित आजार निर्माण होवू शकतात. तरी उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास नजिकच्या दवाखान्यात उपचारासाठी जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभाग ठाणे च्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. 

+