team jeevandeep 30/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : 31 डिसेंबर 2024 सरत्या वर्षाला निरोप देण्या करिता परिमंडळ 3 कल्याण मधील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. परिमंडळ 3 कल्याण मधील सर्व पोलीस स्टेशन मध्ये थर्टीफर्स्ट निमित्त बंदोबस्त लावण्यात येणार असून बंदोबस्ताकरिता 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 83 पोलीस अधिकारी, 532 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
तसेच परिमंडळातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन निहाय
एकूण 17 ठिकाणी नाकाबंदी, फिक्स पॉईंट व पायी पेट्रोलिंग, 27 बीट मार्शल पेट्रोलिंग, 20 पेट्रोलिंग मोबाईल, 8 प्रतिबंधक पथक, 8 छेडछाड विरोधी पथक, 8 बार आस्थापना चेकिंग पथक, 8 तपास पथक, 8 गोपनीय पेट्रोलिंग पथक आदी कार्यरत राहणार आहेत. तसेच वाहतूक शाखेचे 8 ब्रेथ एनालायझर मशीन सह 10 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.