team jeevandeep 22/04/2025 sthanik-batmya Share
पेण(प्रतिनिधी)
'महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई, पनवेल तालुका पञकार संघा च्या प्रथम वर्धपानदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, पञकार इत्यादि क्षेञात देण्यात आलेले पुरस्कारा पैकी डाॅ.देवीदास बामणे यांना 'राज्य शिक्षक पुरस्कार ' देवून सम्मानित करण्यात आला.
प्रा.बामणे हे भाऊसाहेब नेने कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण, जि.रायगड येथे गेले 30 वर्षे हिंदी विषयाचे प्राध्यापक व अध्यक्ष, हिंदी विभागत कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य असून.दर वर्षी काहीं गरीब होतकरू विद्यार्थ्यांची फी भरून त्यांना पुढील शिक्षण घेण्यास मदत करत आहेत. .पेण येथील रेल्वेचा प्रश्न तसेच सामाजिक कार्य साठी अनेक वेळ अंदोलन केले आहे. अनेक कवी सम्मेलनात सहभागी असून त्यांचे कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे.त्यांचा एक पुस्तक प्रकाशित झाला आहे. दोन पुस्तक, एक काव्य संग्रह व दोन अनुवाद केलेले पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहेत . अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यावर्षी 'महाराष्ट्र हिंदी परिषद' या साहित्य क्षेञात नावाजलेले संस्थेच्या संयुक्त सचिव म्हणून पाच वर्षांसाठी बिन विरोध निवड झाली आहे. भारतातील अनेक साहित्यिक क्षेञात अनेक पदावर कार्यरत आहेत. पेण मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष पदावर अलिकडे बिनविरोध निवड झाली आहे. म्हणून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक जण नेहमी कौतुक करीत आहेत.