Visitors: 390192
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाणे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणार्थी महिलांनी केली वटपौर्णिमा साजरी

  Team jeevandeep      11/06/2025      sthanik-batmya    Share


WhatsApp Image 2025-06-10 at 5-34-56 PM 

मराठमोळे सण साजरे करून सांस्कृतिक वारसा जपला

ठाणे : शिक्षकांना बारा वर्षे सेवा पूर्ण केली की वरिष्ठ वेतन श्रेणी व 24 वर्षे सेवा पूर्ण केली की निवड वेतन श्रेणी प्राप्त करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. सेवेत रुजू होतानाची परिस्थिती आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतरे तसेच भविष्यकाळाचा वेध आणि वर्तमान काळातील बदल अंगीकारण्यासाठी दिशा आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ठाणे (डायटचे ) प्राचार्य डॉक्टर संजय वाघ यांचे मार्गदर्शनाखाली ठाणे केंद्र समन्वयक भगवान खारके, डॉक्टर प्रभा खरटमोल यांचे नियंत्रणाखाली सर्व वर्गांचे दहा दिवसांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण दि. ०२ जून २०२५ ते १२ जून २०२५ या कालावधीत एम एच विद्यालय ठाणे या केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे.  

   सदर प्रशिक्षणासाठी प्रत्येक तासानंतर उपस्थिती ऑनलाइन स्वरूपातील असून सर्व तासिकांना उपस्थिती अनिवार्य आहे. जर एखादा प्रशिक्षणार्थी एखाद्या तासिकेस अनुपस्थितीत असेल तर त्याचे प्रशिक्षण पूर्ण होणार नाही याची कल्पना सर्व प्रशिक्षणार्थींना असल्यामुळे दि.10 जून 2025 रोजी  प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांनी वडाची फांदी केंद्रावर आणून त्याची विधीवत पूजा केली. तसेच त्यास फेऱ्या मारून हाच पती जन्मोजन्मी मिळावा व त्यास दिर्घायुष्य लाभावे म्हणून ठाणे केंद्रावरील महिला प्रशिक्षणार्थींनी वटपौर्णिमा साजरी करून मराठमोळ्या सणाचा सांस्कृतिक वारसा जपून वेगळा संदेश दिला आहे.

+