Visitors: 391685
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाकुर्ली रेतीबंदर परिसरात अवैध रेती साठवणूक प्रकरणी कारवाई

  team jeevandeep      05/03/2025      sthanik-batmya    Share


कल्याण :

अवैध रित्या रेती उपसा अवैध रित्या साठवणूक प्रकरणी कल्याण तहसीलदार यांनी धडक कारवाईचा बडगा उगरला आहे. दोन दिवसा पूर्वी उंबर्डे परिसरात 5 सक्शन पंप, 4 बार्ज  अवैध रित्या रेती उपसा प्रकरणी कल्याण तहसीलदार पथकाने कारवाई दरम्यान रेती उपसा सामुग्री जाळीत अवजड बार्जला जल समाधी दिली होती. बुधवारी  कल्याणचे  तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या  सोबत ठाकुर्ली मंडळअधिकारी व त्यांचे अधिनस्त ग्राममहसूल अधिकारी यांच्यासमवेत ठाकुर्ली रेतीबंदर येथील रेती साठवणूक करणाऱ्या एकूण ८ कुंड्यांवर कारवाई करून नष्ट करण्यात आल्या.  खाडी किनारी साठवण्यात आलेला रेतीसाठा जे सी बी मशीनच्या सहायाने खाडीपात्रात ढकलून नष्ट करण्यात आला आहे.

या कारवाई दरम्यान रेतीमाफीया यांचे एकूण अंदाजे रक्कम रुपये ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या कारवाई बडग्यामुळे अवैध रित्या रेती साठवणूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

+