Visitors: 232263
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

जीवनदीप महाविद्यालय गोवेलीच्या माजी विद्यार्थी संघामार्फत राबविण्यात आला एक विशेष उपक्रम

  Team jeevandeep       01/03/2025      sthanik-batmya    Share


maji vidyarthi 

दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघामार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदवी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्याचा एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षांपासून हा उपक्रम माजी विद्यार्थी संघामार्फत राबविला जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र घोडविंदे सर, संचालक मा. श्री. प्रशांत घोडविंदे सर, संचालिका मा.  सौ. स्मिता घोडविंदे मॅम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे सर, उपप्राचार्य प्रा. हरेंद्र सोष्टे सर यांचे विशेष मार्गदर्शन तथा सहकार्य लाभले. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मागील वर्षात पदवी आणि पदव्युत्तर पदवी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे विद्यार्थी प्रतिनिधी श्री. बाळू फुलारे तसेच समन्वयक प्रा. जया देशमुख मॅम, सहसमन्वयक प्रा. रुची शुक्ला मॅम, प्रा. विजय सोनार सर आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

+