team jeevandeep 21/03/2025 sthanik-batmya Share
वासिंद (प्रतिनिधी )-
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तहसीलदार कार्यालय आणि ग.वि.खाडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
ग. वि.खाडे विद्यालय व जुनियर कॉलेज शहापूर येथे जागतिक ग्राहक दिन संपन्न झाला.
या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क कर्तव्य व ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा या संदर्भात मार्गदर्शन होत असते याच हेतूने शहापूर तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक डॉक्टर अमृता सूर्यवंशी व प्रीती जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ग्राहकाची कर्तव्य, त्यांचे हक्क व कोणत्याही वस्तूच्या खरेदीनंतर दुकानदाराकडून किंवा ज्या व्यक्तीकडून आपण कोणतीही सेवा विकत घेत असतो त्या वस्तूची, त्या सेवेची पावती आवश्यक घ्यावी असे स्पष्ट केले. तर आपण सर्वांनी ग्राहक बनावे कोणत्याही दुककानदाराचे आपण गिर्हाईक बनू नये असे प्राध्यापक दिगंबर खरात यांनी म्हटले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर तळपाडे, उपप्राचार्य रविंद्र खरात, प्राध्यापक दिगंबर खरात, शरद विशे, शिक्षक व शिक्षकेतर आदीजण यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर खरात यांनी केले.