team jeevandeep 03/05/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.३-
मुरबाड तालुक्यातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यशस्वी झालेल्या गुलाबी कातकरी वाडीत महावीर इंटरनॅशनल पवई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २० विद्यार्थ्यांसाठी सायकली वाटप करण्यात आल्या तसेच वाडीतील सर्व महिलांना दर्जेदार चप्पला,ताटे, तसेच शाळकरी मुलांना टि शर्ट, दफ्तर खाऊ या वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक रणजित सिंग कुमट, अध्यक्ष अमित जैन,उपाध्यक्ष राजू शर्मा, सचिव विनोद कुमट, खजिनदार सुनील चौधरी, सदस्य अजित जैन,मोनिका जैन, इशाका जैन, सरिता जैन यांनी मेहनत घेतली.शांताई निसर्ग पर्यटन केंद्र शेलारी म्हाडस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री गणेश मित्र मंडळ व गुलाबी वाडी यांचे सहकार्य लाभले.