team jeevandeep 27/03/2025 sthanik-batmya Share
भिवंडी :
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून राजस्थानी समाजामार्फत गणगौर उत्सव मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जातो या सणानिमित्ताने भाईंदर पूर्व व पश्चिम चौपाटींवर महानगरपालिका सुरक्षिततेच्या उपाययोजना करीत असते परंतु उत्सवासाठी दोन्ही संस्थां कडून एकाच वेळेला परवानगी मागितली जात असल्यासकारणाने कार्यक्रमाच्या परवानगी व ठिकाणासंदर्भात नेहमीच वाद होत असत त्या संदर्भात माननीय न्यायालयात दावे देखील दाखल झाले होते त्यामुळे महापालिका व सुरक्षा यंत्रणावर याचे परिणाम होत असत गणगौर उत्सवाची डोकेदुखी ही सर्वांसाठी ठरली होती. त्यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबीनोद शर्मा (भा. प्रो.से.) यांनी मध्यस्थी करून एक चांगला तोडगा काढीत हा वाद कायमचा सोडवला आहे.
याबाबत महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी परिपत्रका द्वारे माहिती देताना सांगितले की, गेल्या आठ वर्षापासून राजस्थानी जनजागरण सेवा संस्था व श्री सप्तेश्वर सालासार हनुमान मंदिर मे सर्वेश्वर चारिटेबल ट्रस्ट या दोन्हीही संस्थांमध्ये गणगौर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परवानगी व ठिकाणाबाबत वाद निर्माण झाला होता आणि या संदर्भात माननीय न्यायालयात ही दावे दाखल करण्यात आले होते त्यामुळे दोन्ही संस्थांची एकत्रित बैठक घेऊन कार्यक्रमाची पार्श्वभूमी मागील कार्यक्रमाबाबतचे अंतिम निर्णय माननीय उच्च न्यायालयाचे आदेशातील वस्तुस्थिती नुसार सदर प्रकरणी अंतिम अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्तांचे असल्याचे एकत्रितपणे घेतलेल्या बैठकीत सांगितल्याप्रमाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबीनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी सदर बैठकीमध्ये दोन्ही संस्था या एकाच समाजातील असून सामाजिक कार्य करीत असल्याने आपल्या संस्थांच्या अर्जाप्रमाणे दोघांनाही एकत्रितपणे कार्यक्रम, उत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन महत्त्वाची मध्यस्थी केल्याने गणगौर उत्सवासाठी परवानगी देऊन या कार्यक्रमास संदर्भातील वादावर कायमचा पडदा पाडला. त्यामुळे 27 मार्च ते 21 मार्च पर्यंत साजरा केला जाणारा गणगौर उत्सव हा अत्यंत समाधान,आनंद व उत्साहात पार पडणार असल्याने राजस्थानी समाजातून आयुक्तांच्या महत्त्वाच्या मध्यस्थी व निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.