Visitors: 231162
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या हस्ते दहागांव नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन !

  team jeevandeep      28/02/2025      sthanik-batmya    Share


वासिंद : येथील दहागांव-कातबाव या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या हस्ते करण्यात आले. 

     दहागांव-कातबाव-कातबाव या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे नविन बांधकाम करण्यात आले आहे. या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी शहापूर आमदार दौलत दरोडा, माजी जि.प. सदस्य मोहन जाधव, खातिवली वासिंद सोसा. माजी चेअरमन जयराम पवार, सरपंच सविता झुगरे, उपसरपंच संजय पवार, रा.काँ. (शरदचंद्र पवार ) पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज विशे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, सतिश पातकर, जेष्ठ कार्यकर्ते लडकू पवार, नागोशेठ मसणे, बाळकृष्ण देसले, बाळासाहेब खारीक, भाई तारमळे, गंगाराम जाधव, त्र्यंबक भांगरे, ग्रामसेवक हिराकांत म्हसकर, राजेंद्र भेरे, संदीप पाटील, राजदिप जामदार, रघुनाथ मसणे, शंकर मसणे, सागर कराळे, विलास धानके, ज्ञानेश्वर मसणे, बाळू लोभी, रविंद्र वावरे आदी पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. 

    दरम्यान, ग्रामस्थांना लागणारे जन्म - मृत्यू व इतर महत्वाचे दाखले आवश्यकता असते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील पवित्र स्थान असतंय, इथूनंच गावाचा खऱ्या अर्थाने विकास होत आहे . ग्रामस्थांच्या या समस्या सोडवून विकास कामांना प्राधान्य द्यावे असे सुरेश म्हात्रे यांनी सांगून या भिवंडी लोकसभा क्षेत्रात ग्रामपंचायत कार्यालय याचबरोबर शाळेचे वर्ग, आरोग्य सुविधा या रखडलेल्या कामांची माहिती द्यावी यांची पूर्तता करुन यासाठी नक्कीच प्राधान्य दिले जाईल असे म्हात्रे यांनी म्हटले. 

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजदिप जामदार, सुत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर यासाठी ग्रामपंचायत समिती, सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते.

+