Visitors: 233473
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कोकण महोत्सवात रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार

  team jeevandeep      27/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण पूर्वेत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आयोजित कोकण महोत्सव 2025 नवव्या दिवशी  नामदार रवींद्र चव्हाण यांनी कोकण महोत्सवला भेट दिली. या भेटीच्या वेळेस कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या नुकत्याच मिळालेल्या जबाबदारीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.     

कोकणातील समृद्ध संस्कृती, चवदार पदार्थ आणि रंगीबेरंगी कलांचं भव्य दर्शन कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना घडावं या उद्देशाने कल्याण मधील कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'कोकण महोत्सव २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन कोकणी संस्कृतीचा आस्वाद घेतला. याप्रसंगी आमदार सुलभा गायकवाड, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

+