team jeevandeep 03/03/2025 sthanik-batmya Share
महापालिका परिक्षेत्रातील आमदार , माजी आमदार यांचा देखील स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली परिसरात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी चौकापासून या अभियानाचा प्रारंभ झाला. आमदार सुलभा गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसिडर डॉ. प्रशांत पाटील, सहा. आयुक्त प्रीती गाडे, धनंजय थोरात तसेच महापालिकेच्या इतर अधिकारी, कर्मचारी वर्गाने आणि डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे 2500 अनुयायांनी या स्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदविला.
डोंबिवलीतही इंदिरा गांधी चौकापासून या स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला, आमदार राजेश मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील शरद पांढरे, अगस्तीन घुटे तसेच इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे 2000 अनुयायांनी या स्वच्छता मोहिमेत उस्फुर्त सहभाग घेतला.
तर डोंबिवली पश्चिमेत आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील अनेक नागरिकांसमवेत, आपल्या सहकाऱ्यांसमवेत तसेच डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अनुयायांसमवेत स्वच्छता अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
आमदार रवींद्र चव्हाण, सुलभा गायकवाड, राजेश मोरे आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्वच्छता अभियानासाठी केलेल्या मदतीबाबत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायांना धन्यवाद दिले.
स्वच्छता ही केवळ महापालिकेचीच नव्हे तर स्वतःची देखील जबाबदारी आहे ही जाणीव या शहरातील प्रत्येक व्यक्तीस झाली तर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही असे उद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी यावेळी काढले.
तर कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर व पर्यावरण पूरक करण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचारी वर्गाबरोबरच महापालिकेचे पदाधिकारी, नागरिक विविध एनजीओज यांनी देखील आपले योगदान द्यावे असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी यावेळी केले.