Visitors: 232197
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

केडीएमसीच्या 61 शाळांमध्ये बसविले 502 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे केडीएमसी शाळांची सुरक्षा सी.सी.टी.व्ही.च्या निगराणीत

  team jeevandeep      03/03/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता महानगरपालिकेच्या एकूण 61 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून 502 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत.

 शासन निर्णयानुसार खाजगी, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते, त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले होते. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी व काही  आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे. मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक राहील. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.

महापालिकेच्या एकूण 61 शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सुरक्षिततेकरिता एकूण 502 कॅमेरे बसविण्यात आले असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांच्या  कक्षात सीसीटीव्ही मॉनिटर बसविण्यात आले असल्याची माहिती विद्युत विभागाचे  कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

+