Visitors: 229797
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

केडीएमसीच्या शिक्षण विभागांतर्गत होणार असाक्षरांची परीक्षा

  team jeevandeep      22/03/2025      sthanik-batmya    Share


 कल्याण :   केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभाग योजना, जि.प.ठाणे शिक्षण विभाग योजना कार्यालय यांच्या आदेशानुसार या शैक्षणिक वर्षातील सर्वेक्षणातून ज्या असाक्षरांची नोंदणी क.डों.मनपा क्षेत्रातील शाळांनी केलेली आहे अशा एकूण 2153 असाक्षरांची परिक्षा दिनांक  रविवार, 23 मार्च2025  रोजी सकाळी 10 ते संध्या.5 या वेळेत होणार आहे. 

या परीक्षेच्या संदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या सूचना  सीआरसी प्रमुखांच्या मीटिंग मध्ये  देण्यात आलेल्या आहेत. सीआरसी प्रमुख त्यांच्या सीआरसी अंतर्गत  सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मिटिंगमध्ये या सूचना देणार आहेत. परीक्षा केंद्रांना जिल्हा, तालुका,मनपास्तरावरील अधिकारी ,शिक्षण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी तसेच सीआरसी प्रमुख भेटी देऊन माहिती घेणार आहेत.

या परीक्षेच्या संदर्भातील सूचना देण्यासाठी शुक्रवार दि. 20मार्च 2025  रोजी सीआरसी प्रमुखांची मीटिंग घेऊन त्यामध्ये शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी  रमेश चव्हाण  तसेच शिक्षणाधिकारी  विजय सरकटे ,विषयतज्ञ चंद्रमणी सरदार तसेच टेक्नोसेवी शिक्षक  विलास लिखार यांनी मार्गदर्शन केले तसेच विषयतज्ञ  संतोष पाटील व  गुरुनाथ इसामे यांनी परीक्षेचे साहित्य वाटप केले, तसेच या परीक्षे संदर्भात  जनजागृती व्हावी जेणेकरून जास्तीत जास्त असाक्षर परीक्षेस उपस्थित राहतील असे आवाहनही शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले आहे.

+