Visitors: 391812
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागामार्फत 62 अनधिकृत नळ जोडण्या खंडीत

  team jeevandeep      27/02/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार व शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण (पूर्व) विभागाला जाणा-या पाणी पुरवठा मुख्य जलवाहिनीवरील दुर्गाडी किल्ला ते सर्वोदय सोसायटी दरम्यान तबेला धारकांनी घेतलेल्या अनधिकृत नळ जोडण्या पोलीस बंदोबस्तात खंडीत करण्याची धडक कारवाई गुरुवारी करण्यात आली.

या कारवाईत 1/2” व्यासाच्या 3 नळ जोडण्या, 1” व्यासाच्या 26नळ जोडण्या, 1 1/2” व्यासाच्या 31नळ जोडण्या व 2” व्यासाच्या 2 नळ जोडण्या अशा एकुण 62 अनधिकृत जोडण्या खंडीत करण्यात आल्या. ही कारवाई पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, शैलेश मळेकर तसेच अ, ब, क, ड, जे व ह प्रभागातील उप अभियंता महेश डावरे, राजेश गोयल, किशोर भदाणे, उदय सुर्यव‍ंशी, व कनिष्ठ अभियंता देवेंद्र एकंडे, सुनिल वाळंज, मयुर शिंदे, दयाराम पाटील आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी पार पाडली.

+