team jeevandeep 08/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : केंद्रात व राज्यात हिदुत्वावादी सरकार आहे तर मग त्यांनी श्री मलंगगड प्रश्न सोडवून दाखवावा असे आव्हांन जेष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी दिले आहे. मलंगगड यात्रा 12 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून त्या निमित्ताने उध्दव ठाकरे गटाच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मलंग यात्रेच्या निमित्ताने लाखो शिवसैनिकांनी आणि हिंदूंनी मलंगडावर उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
यावेळी बैठकीला उपनेते अल्ताफ शेख, जिल्हा प्रमुख धनजंय बोडारे, जिल्हा प्रमुख अँड अल्पेश भोईर, भिवंडी लोकसभा प्रमुख साईनाथ तारे, तात्या माने, जेष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, उपजिल्हा प्रमुख विजय काटकर, शहरप्रमुख सचिन बासरे, विश्वास थळे, सोन्या पाटील, रवींद्र कपोते, दया शेट्टी, शरद पाटील, वंडार कारभारी, दिनेश शेटे, बाळा परब, अभिजीत सावंत, वैशाली दरेकर, अंजली राऊत यांच्या सह शिवसैनिक, महिला आघाडी, युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी जेष्ट शिवसैनिक बाळ हरदास यांनी सांगितले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार 1988पासून श्री मलंगगड लढा धमैवीर आनंद दिघे यांनी सुरु केला. हिंदुत्वासाठी लढा फक्त शिवसेनाच देवु शकते. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो तेथे बाळासाहेबांची शिवसेना धावुन जाते मग तो दुर्गाडी लढा असो वा श्री मलंगगड लढा. आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढु आणि नक्की आम्हाला यश येईल, तसेच केंद्रात व राज्यात महायुतीची व हिंदुत्वाची सत्ता आहे तर मग त्यांनी श्री मलंगगडाचा प्रश्न सोडवावा तसेच मलंगडच्या अनेक समस्या आहेत त्या सोडविल्या पाहिजेत असे सांगितले.