team jeevandeep 19/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.१९-
मुरबाड आगारातून सुटणारी मुरबाड शहापूर लेनाड मार्गे जाणारी बस कुडवलीच्या हद्दीत पलटी होऊन झालेल्या अपघातात बसमधील १६ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत
याबाबत मिळालेली माहिती अशी की मुरबाड आगारातून सुटणारी शहापूर डेपोची बस ही लेनाड मार्गे शहापूरला जात असताना कुडवली गावच्या हद्दीत सदरची बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे.सदर बस क्रमांक एमएच२०बीएल १४७१ ही अपघात झालेली बस शहापूर आगाराची आहे.
या अपघातात बसमधील १६ ते१७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांना तात्काळ आर्थिक मदत म्हणून एसटी महामंडळाकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे देण्यात आल्याची माहिती मुरबाड आधार प्रमुख योगेश मुसळे यांनी दिली आहे.