team jeevandeep 03/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण मधील नामवंत तबला वादक व गुरू कै वि.बा आलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पेशकार हा कार्यक्रम रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. याचे आयोजन होरायजन इव्हेंटस् तर्फे नृत्य साधना यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे. आत्तापर्यंत गेल्या तीन वर्षात पंडित अनिंदो चटर्जी, ओजस अधिया, आदित्य कल्याणपूर, सत्यजीत तळवलकर, यशवंत वैष्णव, स्वप्नील भिसे यांसारख्या कलाकारांनी आपले तबलावादन पेशकार मध्ये सादर केले आहे.
यंदाच्या वर्षी पहिल्या सत्रात आजचे आघाडीचे युवा तबला वादक ईशान घोष यांचे एकल तबला वादन होणार असून त्यांना सारंगी नगमा संगत साबीर खान करणार आहेत. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध युवा कथक नर्तक निखिल परीहार यांचे कथक नृत्य सादर होणार आहे. त्यांना तबला साथ ईशान परांजपे यांची असून हार्मोनियम साथ अथार्व कुलकर्णी यांची असणार आहे तसेच पखवाज साथ रोहित खावले यांची असून पढंत अथर्व वैरागकर करणार आहेत.
नेहमीप्रमाणेच तबला/कथकप्रेमी रसिक तसेच संगीत शिकणारे विद्यार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे होरायजन च्या स्वप्नील भाटे यांनी सांगितले. संपर्क : प्रशांत दांडेकर 9820578298, स्वप्नील भाटे 9820232659