Visitors: 229032
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

उन्हाळी प्रवासासाठी महाराष्ट्राची लाल परी सज्ज... ठाणे विभागाचे विशेष नियोजन ..

  team jeevandeep      27/03/2025      sthanik-batmya    Share


ठाणे  :

उन्हाळी हंगामा करीता एसटीचा ठाणे विभाग सज्ज असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाने दिलेली असून

१५ एप्रिल ते १५ जुन  या दरम्यान प्रवाशांकरिता जादा फेऱ्यांचे नियोजन एसटी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.सदर  फेऱ्या आरक्षणासाठीही उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

     ठाण्याहुन कोल्हापूर , मायणी , चोपडा, नारायणगाव, सोलापूर , आटपाडी,  भिवंडी वरून शेवगाव, अहमदपूर, चिपळूण ,आष्टी,.. शहापुर वरुन चोपडा ,साक्री ,.कल्याणहून बामनोली, लोणार, वडूज, धुळे, जामखेड.तसेच  मुरबाड वरुन शिरूर (व्हाया लोणी) शिरूर (व्हाया जांबृत ),शिरूर (व्हाया बेल्हा) , बदलापूर घोट तसेच विठ्ठलवाडी वरून गुहागर, दापोली, भीमाशंकर या मार्गावर  जादा फेऱ्यांचे नियोजन ठाणे विभागाने  केले आहे .

     त्याचप्रमाणे वंदना स्थानकातुन सकाळी ६ ते  रात्री १० वाजेपर्यंत दर एक तासांनी  साताऱ्या करिता एसटी उपलब्ध करण्यात आली आहे .तसेच दर अर्ध्या तासाने ठाणे स्वारगेट या मार्गावर  ई शिवनेरी धावणार आहे.

     एसटी सार्वजनिक वाहतुकीचा कणा आहे.प्रवाशांची खाजगी मालकांकडून या गर्दीच्या हंगामात होणारी लुट थांबावी  या करिता एसटी ने शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपताच , लग्नसराई तसेच पर्यटनास बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा विचार करून उन्हाळी हंगामाचे  तातडीने नियोजन केले आहे याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी या नियोजनाची नोंद व सेवेचा लाभ घ्यावा असे एसटी वाहतूक विभागाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

   प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी विभागाच्या ब्रीदवाक्यानुसार उन्हाळी हंगामात एसटी फेऱ्यांचे प्रवाशांसाठी केलेले नियोजन याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त करीत आहेत.

+