team jeevandeep 06/05/2025 sthanik-batmya Share
डोंबिवली :
देशाच्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्याव्यात असे आदेश राज्यसरकारला मंगळवारी दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केलेच पाहिजे कारण अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिका माध्यमातून प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता या निर्णयामळे निवडणुका होवून लोकप्रतनिधींच्या माध्यमातून योग्य विकास कामे होतील
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक निर्णयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले येथील पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक होण्यासाठी अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पहात आहेत. त्यांना निवडणुकीच्या उत्सवात भाग घेता येईल आणि त्यांनाही लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. कारण लोकनियुक्त प्रतिनिधी महापालिकेवर असणे आवश्यक आहे असेही मोरे यांनी सांगितले.