Visitors: 227194
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

आमदार किसन कथोरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट विविंग गॅलरी(काचेचा स्काय वॉक) मार्गी लागणार !

  team jeevandeep      28/04/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड-प्रतिनिधी :

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील  माळशेज घाटात मोठ्या संख्येने येणाऱ्या  पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारी   काचेची  व्हि्विंग गॅलरी अर्थात काचेचा स्काय वॉक प्रकल्प  सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार  यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणी मध्ये कुठे अडचणी येतात त्या बाबत विचारणा करून निधीच्या तरतुदीबाबत मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत तातडीने प्रस्ताव सादर केल्यास नियोजन विभागाकडून या प्रकल्पाला तातडीने निधीची तरतूद करून शासन निर्णय काढण्यात येईल असे मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना सूचना दिल्या त्यामुळे आता माळशेज घाटात काचेचा स्काय वॉक उभारण्यासाठी चालना मिळणार असून, त्यामुळे मुरबाड तालुका पर्यटकांसाठी पर्वणी  ठरणार आहे.

  माळशेज घाटात वर्षभर पर्यटक येत असतात, पावसाळ्यात येथील धबधबे आणि नैसर्गिक ढगाळ व धुके असलेल्या वातावरणाने पर्यटक याभागात अधिक संख्येने येतात.त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. माळशेज घाटात चीन देशातील काचेच्या व्हि्विंग गॅलरी प्रमाणेच भव्य गॅलरी उभारण्याचा  प्रस्ताव  आमदार किसन कथोरे यांनी तयार करून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. 

    आज आयोजीत केलेल्या बैठकीसाठी, सचिव पर्यटन, सचिव, वित्त व नियोजन, सचिव वने,मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मा.जिल्हाधिकारी ठाणे मा.जिल्हा नियोजन अधिकारी ठाणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे, कार्यकारी अभियंता, ठाणे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2, अनिल घरत व इतर सर्वसबंधित अधिकारी उपस्थित होते.

 राज्यात पर्यटकांच्या  वाढीसाठी  तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात काचेचा वि्हिंग गॅलरीचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. भारतातील हा पहिला प्रकल्प असेल. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.

+