Visitors: 227304
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

आठ वर्षात २२६गडकिल्ले सर करणारा अवलिया सुभाष मानकर

  team jeevandeep      29/04/2025      sthanik-batmya    Share


पेण(प्रतिनिधी)

मुळात मुळशी तालुक्यातील कोरी गडाच्या पायथ्याशी छंद म्हणून शनिवार रविवार त्या किल्ल्यावर जाणे येणे असल्याने  किल्ल्यांची आवड निर्माण झाली . छत्रपती शिवरायांबद्दल  मनात प्रचंड आदर असल्यामुळे शिवरायांनी स्थापन केलेले गड किल्ले बघणे व त्यांचा अभ्यास करणे अशी इच्छा मनात आपोआप निर्माण झाली व त्यातूनच अनेक प्रकाराने किल्ले बघण्यास सुरुवात झाली  

 मुळशी तालुक्यातील दुर्गम डोंगर भागातील २७ किल्ल्यांना भेटी देत २०० किल्ल्यांचा ट्रेक अंबवणे या गावातील व पनवेलमधील गड किल्ल्यांचा ट्रेकर शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान अहमदनगरच्या सुभाष मानकर यांनी गड किल्ल्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी २०१७ पासून आजपर्यंत २२६ गड किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केले असल्याने सुभाष मानकर यांच्या साहसी वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सन २००१ ते २०१५ या कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर आज  ते  पनवेल येथील सीकेटी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत.

     कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गड किल्ले जवळजवळ पूर्ण केलेले असून प्रत्येक महिन्याला एक ट्रेकचे नियोजन केले जात असून त्यांनी आतापर्यंत पुणे, रायगड, ठाणे, सातारा, नाशिक, पालघर, कोल्हापूर, धुळे, जळगाव, गोवा, कर्नाटक, गुजरातच्या किल्ल्यांचे भ्रमण केले आहे. किल्ल्यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावा त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याकरिता गड किल्ल्यांवर जाऊन त्यांनी वाढलेले गवत, प्लास्टिक जमा करणे, गड किल्ल्यांची सफाई साफसफाई  व परिसर स्वच्छता अशा मोहिमांमध्ये सहभाग  घेऊन प्रत्येक गडकोट किल्ल्यांचे  फोटो व त्याची माहिती घेत गडकोट  किल्ल्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आतापर्यंत २२६ किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केला आहे. 

   रविवार आणि जोडून सुट्टी आली की महिन्यातून एक दोन किल्ले तरी बघितले जातात किंवा ज्या वेळेस मे महिना आणि इतर वेळेस सुट्टी असते त्या सुट्ट्यांचा वेळेत किल्ले बघणे हा छंद जोपासला जातो.

   गड किल्ल्यांचे नियोजन करताना सांगितले की आम्ही एका दिवसामध्ये अवघड  किल्ला असेल तर एकच करतो मध्यम श्रेणीचा किल्ला असेल तर एका दिवसात दोन किंवा तीन किल्ले करतो आणि भुईकोट किल्ला असेल तर एका दिवसात पाच ते सहा किल्ले होतात अशा प्रकारे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली जाते

    पहिल्यांदाच मी हरिहर किल्ल्यावरती गेलो पण हरिहर हा किल्ला काटकोनात उभा आहे आणि सरळ पायऱ्यांचा आहे अर्ध्यावर गेलो आणि मला चक्कर यायला लागली मी अक्षरशः तिथे एक तास बसून राहिले मग नंतर मला माझ्या सहकाऱ्यांनी कसेबसे वरती घेऊन गेले कारण तो किल्ला अतिशय अवघड श्रेणीचा आहे पण नंतर ठरवले की नाही आपण आपली हिंमत हरायची नाही आपली उंचावर जाण्याची भीती मोडली पाहिजे  या उदात्त हेतूने प्रेरित होउन मी सतत किल्ले सर करत करत  माझी भीती पूर्ण मोडून काढली आहे.

   मागील वर्षी शिवलिंग शुल्क लोणावळ्या जवळ आहे त्यावर आम्ही चार-पाच जण चढाई करत होतो वरती गेलो आणि खाली उतरताना आम्हाला खूप त्रास झाला आणि अर्ध्यावर आमचे पाणी संपले मग आम्ही ते पाणी  जनावरे माकड वगैरे पाणी पितात त्या ठिकाणचे पाणी चार ते पाच वेळा गाळून ते पाणी आम्ही पिले म्हणजे यातून मला एक शिकायला मिळाले की किल्ल्यावर जाताना तुमच्याकडे मुबलक पाणी असणे गरजेचे आहे.शेवटी एकच निश्चय करून सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत मी 500 किल्ले सर करणार असा  मानस  सुभाष मानकर यांनी केला.

+