team jeevandeep 03/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.३-
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या सेवेत उत्तमरीत्या काम करणारे व तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे अरुण गोंधळी हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गेगाव गावचे सुपुत्र आहेत. अरुण गोंधळी हे नुकताच सेवानिवृत्ती झाले, गोंधळी हे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी पर्यंत प्रवास करीत असताना त्यांनी सेवा सहकारी सोसायट्या, दूध उत्पादक शेतकरी सोसायटी , महिला बचत गट तसेच छोटे मोठे लघु उद्योग सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करून आर्थिक पाठबळ दिले त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे.
त्या निमित्ताने सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सेवापुर्ती सोहळ्याला भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक शिवाजीराव शिंदे, यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील व गेगगाव पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.