team jeevandeep 18/03/2025 saptahik rashi bhavishya Share
मेष
हा आठवडा आपणास सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कौशल्यतेचा व क्षमतेचा चांगला लाभ मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात थोडी वाढ होत असल्याचे दिसू शकते. परंतु त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. हळू हळू परिस्थितीत बदल होऊन आपण नवीन कामे करू शकाल. आपले कौटुंबिक वातावरण सुद्धा आपणास अनुकूल असेल. कुटुंबियांच्या सहकार्याने आपणास व्यापारात चांगला फायदा होऊ शकतो. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवलात तर आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. त्याच्या जोडीने आव्हानांना सामोरे जाऊन आपण उन्नती करू शकाल. आपली प्रकृती उत्तम राहिल्याने आपल्या ऊर्जेत वाढ होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभ
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी फोन वर तर बोलालच शिवाय सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन टिक टोक व फेसबुक वर तिच्याशी संपर्क साधून आपले नाते दृढ कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त होईल. आपण आपल्या सासुरवाडी कडील एखाद्या सोहळ्यास हजेरी लावण्यास जाऊ शकता. नोकरीत आपली पदोन्नती सुद्धा संभवते. पगारवाढ झाल्याने आपण अत्यंत खुश व्हाल. मन हर्षित होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांनी आठवड्याच्या सुरवातीस कोणतेही मोठे काम हाती घेऊ नये. कारण त्यात समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. त्यांच्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. नशिबाच्या जोरावर ते आपली कामे पूर्ण करू शकतील. प्राप्तीत वाढ होईल. तसेच प्राप्तीचे एखादे चांगले स्रोत मिळू शकते. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मिथुन
हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या हृदयात जागा निर्माण करण्यासाठी भरपूर प्रयत्न कराल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या दोघांत रोमँटिक संवाद होऊन एकमेकांप्रती आकर्षण वाढेल. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या कुटुंबावर पूर्ण लक्ष देऊन आपल्या कामात सुद्धा समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. त्यात आपला बहुतांश वेळ खर्च झाला तरी आपणास समाधान लाभेल. नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. त्यांच्या व्यापारात जलद गतीने वाढ होईल. आपणास एखादी संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळेल. आपले वायफळ खर्च होत आहेत त्यावर आपण नियंत्रण ठेवावे. अन्यथा आपल्या आर्थिक स्थितीवर त्याचा भार वाढू शकतो. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्क
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या रहस्यमय जगातून बाहेर पडून आपल्या प्रेमिकेचे मन समजून घ्यावे लागेल. आपले वैवाहिक जीवन काही आव्हानांसह पुढे जाईल. ह्या दरम्यान आपल्या वैवाहिक जोडीदाराशी कोणताही वाद घालू नये. अन्यथा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यापाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कराशी संबंधित समस्या भेडसावू शकतात. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात जलद गतीने वाढ होईल. परंतु प्राप्ती चांगली झाल्याने जास्त चिंता करावी लागणार नाही. आठवड्याचे मधले दिवस अपेक्षेनुसार चांगले जातील. आपले मनोबल वाढेल. आपण खुश व्हाल व इतरांना सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीत चढ - उतार येतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ते खोलवर जाऊन अध्ययन करतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आपल्या नात्यात रोमांसासह आपसातील सामंजस्य वाढेल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना सुखद बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात प्रगती होईल. व्यापारी त्यांच्या व्यवसायात यशस्वी होतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपणास आपल्या कामाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही मानसिक चिंता असतील ज्या आठवड्याच्या मध्या पर्यंत दूर होऊ शकतील. आपणास नशिबाची साथ मिळेल. आपली प्रकृती चांगली राहिल्याने आपण वेळेचा आनंद लुटू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. असे असले तरी आपण आपल्या स्फुर्तीमुळे कामात यशस्वी होऊ शकाल. प्रेमीजनांना त्यांच्या प्रणयी जीवनात चढ - उतारांना सामोरे जावे लागले तरी त्यांच्यात प्रेमळ वार्तालाप होईल. एकमेकांचे हृदय जिंकण्यात ते यशस्वी होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या नात्यात अत्यंत क्रियाशील राहून आपल्या जोडीदारास खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या इमानदारीसाठी ओळखले जातील. व्यापाऱ्यांना दूरवरच्या ठिकाणाशी किंवा राज्याशी संबंधित काम करण्याचा लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात काही अडथळे येऊ शकतात. परंतु त्यांना त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेचा अभ्यासात लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
तूळ
हा आठवडा आपणास अत्यंत चांगला आहे. प्रेमीजनांना नात्यातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. ह्या आठवड्यात आपण प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. वरिष्ठ त्यांच्यावर खुश होतील. त्यांची कामगिरी उठून दिसेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. मात्र, आपण कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. शासना विरुद्ध कोणतेही काम करू नये. विद्यार्थी अभ्यास जोमाने करून चांगले परिणाम मिळवू शकतील. मानसिक दृष्ट्या आपण खुश व मजबूत असल्याने प्रत्येक काम आपण मन लावून यशस्वीपणे कराल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृश्चिक
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुखद होईल. आपल्या प्रेमिकेशी भरपूर वार्तालाप केल्याने ते आनंदित होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने ओथंबून जाईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामावरील निष्ठेचा लाभ मिळेल. व्यापारवृद्धीसाठी व्यापारी काही नवीन योजना घेऊन येऊ शकतात. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत वाढ होईल. मात्र, आठवड्याच्या मध्यास ती कमी होऊन खर्चात वाढ होईल. आठवडा अखेरीस मात्र सर्वकाही सुरळीत होईल. मानसिक दृष्ट्या आपण मजबूत व्हाल. परिस्थितीचे आकलन करून काम करण्यास आपण प्राधान्य द्याल. त्यामुळे आपणास चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही अडथळे येण्याची संभावना असल्याने त्यांना सामोरे जाण्यास तयार राहावे लागेल. जोमाने अभ्यास केल्यास ते चांगले परिणाम मिळवू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
धनु
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी मात्र आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. त्यांच्या संबंधात दुरावा येण्याची संभावना असल्याने दुरावा निर्माण होणार नाही ह्याची काळजी त्यांनी घ्यावी. विवाहित व्यक्ती आठवड्याच्या सुरवातीस आपले वैवाहिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदारा समोर आपले मन मोकळे करतील. तसेच त्यांना एखादी भेटवस्तू देऊन खुश करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. एखादी घटना अचानकपणे घडल्याने आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापाऱ्यांच्या हाती एखादे मोठे काम आल्याने त्यांचा व्यापार जलद गतीने प्रगती करेल, जो लाभदायी ठरेल. आठवड्याचे मधले दिवस विशेष अनुकूल नसल्याने कोणत्याही प्रकारे मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. तसेच कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. आठवड्याच्या अखेरीस आपणास नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते मन लावून अध्ययन करतील. त्यांची मेहनत फलद्रुप होईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहिली तरी ताप येण्याची शक्यता असल्याने गरज भासल्यास औषध घ्यावे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मकर
हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. आपणास आपल्या प्रेमिकेचे म्हणणे सुद्धा ऐकून घ्यावे लागेल. प्रत्येक वेळी तिनेच आपले म्हणणे ऐकावे असा आग्रह धरू नये. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. कुटुंबातील लहानग्यांचे प्रेम मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात चांगले परिणाम मिळतील. आपली मेहनत लोकांच्या नजरेत भरेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. त्यांच्या कौशल्याचा त्यांना फायदा होईल. खर्चात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रगती साधण्यासाठी अभ्यास जास्त जोमाने करावा लागेल. प्रकृतीत चढ - उतार होताना दिसू शकते. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कुंभ
हा आठवडा आपणास चांगला आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. विवाहितांना सुखी वैवाहिक जीवनासाठी वयोवृद्धांचे आशीर्वाद मिळाल्याने त्यांच्या जीवनातील समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे दृढपणे करतील. ते भरपूर मेहनत करतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. त्यांच्या प्राप्तीत वाढ झाल्याने ते आपल्या व्यापाराच्या बाबतीत आशावादी होतील. ते योग्य निर्णय घेतील. त्यांनी उचललेल्या पाऊलांची प्रशंसा होईल. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना अध्ययनात सुखद परिणाम मिळतील. खर्चात कपात होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
मीन
ह्या आठवड्यात आपणास चांगले परिणाम मिळतील. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या प्रेमात भिजून जातील. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या जोडीदाराच्या सहकार्याने ते त्यांच्यावरील सर्व जवाबदाऱ्या पूर्ण करू शकतील. कौटुंबिक जीवनात शांतता नांदेल. आपल्या कामात कुटुंबीय आपणास मदत करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. असे असले तरी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन केल्यास आपले नुकसान होऊ शकते. तेव्हा काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. त्यांच्या योजना यशस्वी झाल्याने त्यांना चांगला लाभ होईल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या सुद्धा अनुकूल आहे. नशीब प्रबळ असल्यामुळे कामात यश प्राप्ती होऊ शकेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेचा लाभ मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार होताना दिसून येईल. परंतु आठवड्याच्या अखेरीस आपला मानसिक ताण कमी होऊन आपण पूर्ण स्फुर्तीने आपली सर्व कामे करू लागाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.