Visitors: 227047
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

साप्ताहिक राशी भविष्य | 18 फेब्रुवारी २०२5

  team jeevandeep      18/02/2025      saptahik rashi bhavishya    Share


मेष

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहिले तरी ऋतू बदलामुळे होणाऱ्या विकाराने आपण त्रस्त होऊ शकता. आपणास जर जमीन - जुमल्यात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर आठवड्याच्या अखेरीस तसे करू शकता. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामात कोणत्याही प्रकारचे बदल न करणे हितावह ठरेल. प्रेमीजनांनी प्रेमिकेशी संवाद साधताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा भांडण होऊ शकते. वैवाहिक जीवनात वाद वाढण्याची संभावना आहे. जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ

ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. ह्या आठवड्यात आपल्या सर्व समस्या दूर होतील. आपणास जर अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्तरांचा सल्ला घ्यावा. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारास पुढे नेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. ज्यांना आपल्या नोकरीत बदल करावयाचा आहे, त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास जर एखादे वाहन खरेदी करावयाचे असेल किंवा घराचे नूतनीकरण करावयाचे असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपले खर्च वाढू शकतात. ह्या आठवड्यात एखाद्या गोष्टीमुळे आपल्या प्रेमिकेशी आपला वाद होण्याची संभावना आहे. दांपत्य जीवनात सुद्धा वाद संभवतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित परिणाम मिळू शकतात.

मिथुन

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ह्या आठवड्यात आपले जुने विकार उफाळून येण्याची संभावना आहे. त्याचा आपणास खूप त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या स्वतःसाठी व घरात काही सामान खरेदी करण्यासाठी आपला जास्त पैसा खर्च होऊ शकतो. आपला व्यवसाय उत्तम चालेल. आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी आपणास जास्त परिश्रम करावे लागतील. ज्यांना आपली नोकरी बदलावयाची आहे त्यांना ह्या आठवड्यात चांगली संधी मिळू शकते. आपला जर प्रेमभंग झाला असेल तर आपली प्रेमिका आपल्याकडे परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण अधिक प्रसन्न व्हाल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. आपण जर एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर आपण त्यात यशस्वी होऊ शकता.

कर्क

हा आठवडा आपणास चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास नेत्र विकार त्रस्त करण्याची संभावना आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. व्यापाऱ्यांना सट्टा बाजारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. असे असले तरी नोकरीत किंवा व्यापारात कोणत्याही प्रकारे घमंड व्यक्त करू नका. आपणास जर कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास सहजपणे कर्ज मिळू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यास व ज्ञान प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. त्यांचा बहुतांश वेळ मित्रांशी गप्पा मारण्यात जाण्याची संभावना असून त्यांनी तो टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जोडीदाराच्या सहवासात घालविण्याचा प्रयत्न करावा.

सिंह

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपण जर अनेक दिवसांपासून आजारी असाल तर निष्काळजीमुळे आपला आजार बळावण्याची संभावना आहे. त्यामुळे आपण त्रस्त होऊ शकाल. हा आठवडा व्यावसायिकांसाठी चांगला आहे. नवीन व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. परंतु त्यांनी कोणाशी वाद घालणे टाळावे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. अन्यथा शेवटच्या क्षणी त्रास होऊ शकतो. आपल्या पासून दुरावलेली प्रेमिका आपल्याकडे परत येऊ शकते. आपल्या वाणीच्या प्रभावाने वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते.

कन्या

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपण जर एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर ह्या आठवड्यात त्यात हळू हळू उतार येऊ शकतो. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारात आजवर जी काही मेहनत केली आहे त्याचा लाभ त्यांना ह्या आठवड्यात होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. आपणास जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आपणास चांगली संधी मिळू शकते. आपली आर्थिक स्थिती सामान्य राहील. हा आठवडा आर्थिक देवाण - घेवाण करण्यास अनुकूल नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा उत्तम आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी विवाह बंधनात अडकू शकता. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. आपणास आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यापारी एखादा नवीन सौदा करू शकतील. ते आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यात यशस्वी होऊ शकतील.

तूळ

हा आठवडा आपणास ठीक आहे. आपल्यात ऊर्जा असली तरी एखाद्या आजाराने आपण काहीसे त्रस्त होऊ शकता. परंतु आपण वेळ काढून त्याचा सामना केल्यास तो गंभीर स्वरूप धारण करणार नाही. आपणास त्या आजारावर योग्य उपाय सुद्धा सापडू शकेल. आपले शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून सकाळचे चालणे व योगासन ह्यांना आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे. ह्या आठवड्यात काही फुटकळ कामात आपण जास्त पैसा खर्च कराल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये, अन्यथा नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी सध्याची नोकरी चालूच ठेवावी. नोकरीत बदल केल्यास त्रास होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. वैवाहिक जीवनात काही गैरसमजांमुळे त्रास होऊ शकतो.

वृश्चिक

हा आठवडा आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. तेव्हा ह्या आठवड्यात आपणास सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. आपणास एखादा दीर्घकालीन आजार होऊ शकतो. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना खूप मोठा फायदा होण्याची संभावना आहे. ते आपल्या कामात प्रगती करू शकतील. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असण्याची संभावना असल्याने आपल्या प्रेमिकेशी नीट वागावे. वैवाहिक जीवनात सुद्धा कटुतेमुळे शांतता भंग होऊ शकते. आपला जोडीदार आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ मुलांसाठी काढून त्यांना फिरावयास घेऊन जावे. व्यापारात गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते.

धनु

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. आरोग्य विषयक कोणताही त्रास संभवत नसला तरी बाहेरील तळकट पदार्थ खाणे मात्र टाळावे. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. आपला व्यापार उत्तम चालेल असा एखादा नवीन प्रकल्प आपणास मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी थोडे सावध राहावे. कार्यालयीन राजकारणा पासून त्यांनी दूर राहावे. आपली बँकेतील शिल्लक उत्तम असेल. आपणास जर एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेमीजन द्विधेत राहतील. त्यांनी आपल्या प्रेमिकेशी संवाद साधून तिला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यासच त्यांचे नाते टिकू शकेल, अन्यथा त्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी भरपूर रोमांस करू शकाल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ते यशस्वी होऊ शकतील.

मकर

ह्या आठवड्यात आपणास पायदुखी किंवा रक्तवाहिन्यांचा त्रास होऊ शकतो. आपण काम करत असताना अधून - मधून थोडी विश्रांती घ्यावी. दुर्लक्ष केल्यास त्रास अजून वाढू शकतो. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय चालवताना घमंड दूर ठेवून संयमाने कामे करावीत. हा आठवडा नोकरी बदलण्यासाठी प्रतिकूल असल्याने जी नोकरी चालू आहे तीच करत राहावी. विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ मित्रांच्या सहवासात न घालवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. जमीन - जुमला व कर्ज घेण्यासाठी सुद्धा हा आठवडा प्रतिकूल आहे. तेव्हा थोडे थांबावे. कार्यातील व्यस्ततेमुळे आपण वैयक्तिक संबंधांकडे लक्ष देऊ शकणार नाही. नाते दृढ करण्यासाठी जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवावा. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होऊ शकेल.

कुंभ

ह्या आठवड्यात आपण जुनाट विकाराने जास्त त्रस्त होण्याची संभावना आहे. तेव्हा एखाद्या चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करू नये. व्यापाऱ्यांसाठी आठवडा प्रतिकूल आहे. त्यांना व्यापारात जास्त फायदा होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीचा आलेख खाली येईल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नसल्याने ते दुसऱ्या नोकरीचा शोध घेण्यास सुरवात करू शकतील. ह्या आठवड्यात आपण कुटुंबासाठी पैसे खर्च कराल. प्रेमीजनांचे प्रणयी जीवन सुखद झाले तरी एखाद्या गैरसमजामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. लवकरात लवकर हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीमुळे कटुता येऊ शकते. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा वाद वाढू शकतो.

मीन

हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आपल्यात भरपूर ऊर्जा राहील. आपणास एखादी दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना सावध राहावे. व्यावसायिकांचा व्यवसाय उत्तम चालेल. त्यांची काही कामे पुन्हा सुरु होऊ शकतात. नोकरीत बदल न करणे आपल्यासाठी हितावह राहील. ह्या आठवड्यात फुटकळ खर्च करणे टाळावे. वाहन खरेदी करावयाचे असल्यास तो विचारपूर्वक करावा. व्यक्तिगत संबंधात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वाद होऊ शकतो. आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जोडीदारावर शंका घेऊ नये. वैवाहिक संबंधातील माधुर्य टिकून राहील. आपल्या जोडीदारासह रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. त्यांच्या बरोबर आपल्या मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याच्या प्रयत्नात एखादी नवीन आर्थिक योजना सुद्धा आपण आखू शकता.

+