team jeevandeep 06/02/2025 pak-kruti Share
सोया चंक्स बाॅल्स :- सोयाबीनची भाजी, सोयाबीन राईस अशा सोयाबीनच्या अनेक रेसिपी आपण घरच्या घरी ट्राय केल्या असतील. पण तुम्ही कधी सोया चंक्स बाॅल्स बनवले आहेत का? नाही.. तर लगेच ट्राय करा. काहीच मिनिटांत बनणाऱ्या या सोया चंक्स बाॅल्सची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य :-
1 कप सोय चंक्स
1 टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट
2 पुडे मॅगी मॅजिक मसाला
1 टीस्पून दही
1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
थोडी चिरलेली कोथिंबीर
1/2 लिंबू
चवीप्रमाणे मीठ
2 टेबलस्पून मैदा
2 टेबलस्पून काॅर्नफ्लाॅवर
तळण्यासाठी तेल
कृती :-
उकळलेल्या पाण्यात सोया चंक्स घालून पाच मिनिटे झाकून ठेवणे. पाच मिनिटांनी दुसऱ्या पाण्याने धुऊन घेणे व त्यातील पाणी हाताने दाबून काढणे.
मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटण करून घेणे. सर्व मसाले घेणे.
बारीक केलेले एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात आले-लसूण पेस्ट घालून घेणे. नंतर सर्व मसाले घालून घेणे. मॅजिक मसाल्यात मीठ असते. त्यामुळे मीठ घालताना थोडेसे कमीच घालावे. वरून लिंबू पिळून घ्यावा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे.
नंतर कॉर्नफ्लॉवर व मैदा घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मळून घेणे. व्यवस्थित गोळा तयार करून झाला की, त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणे.
गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवावा. तेलात बसतील तेवढे, बॉल्स घालून घेणे. छान लालसर रंगावर तळून घेणे.
खाण्यासाठी तयार सोया चंक्स बाॅल. हे तुम्ही हिरवी चटणी, नुसते किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता.