Visitors: 389921
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मटार कचोरी

  TEAM JEEVANDEEP      20/01/2025      pak-kruti    Share


 

साहित्य-

मैदा दोन काप, तूप चार चमचे, चवीनुसार मीठ, पाणी आवश्यक्तेनूसार, हिरवे मटार एक कप, आले मिरची पेस्ट, एक चमचा हींग, जिरे एक चमचा, बडीशोप पूड, एक चमचा धणेपूड, एक चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमसूल पावडर, अर्धा चमचा.

कृती-

एका मोठ्या भांड्यात मैदा घ्यावा. तसेच त्यामध्ये तूप आणि मीठ घालावे व मिक्स करावे. आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. तसेच पीठ 20 मिनिटे बाजूला झाकून ठेवावे. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे व हिंग घालावे. यानंतर आले-हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावी. आता त्यात मिक्सरमध्ये जाडसर दळलेले मटार घालून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतून घ्यावे. तसेच बडीशेप, धणेपूड, तिखट, गरम मसाला, आमसूल पावडर आणि मीठ घालावे. आता हे परतवून घ्यावे. आता आपले सारण तयार आहे. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे. आता एक गोळा घेऊन त्यामध्ये मटारचे सारण भरावे व कचोरीचा आकार द्यावा. आता पॅनमध्ये तेल गरम करावे. कचोऱ्या मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा. तर चला तयार आहे आपली गरमागरम कुरकुरीत मटार कचोरी हिरव्या कोथिंबीर चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.  

+