team jeevandeep 02/05/2025 pak-kruti Share
किसलेला कोबी, गाजर पिळून घ्या. त्यात मिरपूड, आलं लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, तिखट, मैदा, कॉर्नफ्लोर घालून एकजीव करा व शेवटी मीठ घालून एकजीव करा (शेवटी मीठ घातलं की पाणी सुटत नाही). या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून तेलात मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्या. टीशूपेपरवर काढा.
मंचुरीयन बनविण्यासाठी :
पॅनवर तेल घालून त्यात चिरलेला लसूण व आलं घाला नंतर त्यात कांद्याचे व सिमला मिरचीचे तुकडे घाला. ते परतून त्यात कोबी लांबट किसलेला घाला, हे सर्व अर्धकच्चे शिजवायचे.
नंतर त्यात रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, मिरपूड, मीठ (मीठ बेताचंच घाला कारण सर्व सॉसमध्ये मीठ असते)
वाटीत कॉर्नफ्लोर व पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट घाला.
नंतर त्यात फ्राय केलेले मंचुरीयन बॉल्स घाला. परतून वरून कांद्याची पात घाला. सर्व्ह करा व्हेज मंचुरीयन....