team jeevandeep 17/04/2025 pak-kruti Share
साहित्य -
खायची पाने - 6 ते 7
गुलकंद - 2 चमचे
साय - 1 कप
मिल्कमेड डब्बा
ड्रायफुट्स -
बडीशेप - 3 चमचे
कृती -
पाने धुवून बारीक कापून घ्यावेत. यानंतर पाने मिक्सरमध्ये बारीक करावीत.
तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढा आणि त्यात मिल्कमेड, गुलकंद, बडीशेप घालावी.
पुन्हा सर्व मिश्रण मिक्सरमध्ये किंवा तुम्ही बिटरच्या साहाय्याने बारीक करू शकता.
तयार मिश्रणात ड्रायफुट्स घालावेत. तुम्ही ड्रायफुट्सऐवजी टुटी फ्रुटी सुद्धा वापरू शकता.
यानंतर काचेचे ग्लास घ्या, त्यात हे मिश्रण ओता आणि कुल्फी हातात धरण्यासाठी काठी लावा.
कुल्फी सात ते आठ तासांसाठी थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावी.
तुमची उन्हाळा स्पेशल पान कुल्फी तयार झाली आहे.