TEAM JEEVANDEEP 10/02/2025 pak-kruti Share
कृती- टमाटर काढून घेतले स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन घेतले एका प्लेटमध्ये काढून कोरडे करून घेतल बीटरूट धुऊन घेतला टमाटर कापुन एका भांड्यात काढून घेतले.
टमाटर आणि अर्ध बीट रूट एकत्र करून गॅस सुरू करून गॅसवर भांड ठेवून भांड्यात टमाटर शिजू दिले टमाटर छान शिजल्यानंतर नरम झाल्यानंतर ते थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले.
मिक्सर मध्ये छान बारीक करून घेतलं बारीक केलेलं मिश्रण चाळणीच्या साहाय्याने चाळुन घेतलं.
चाळणीच्या साह्याने काढून घेतलेली पेस्ट एका भांड्यात काढून घेतले आणि गॅस सुरू करून गॅस वर ते भांड ठेवलं व टोमॅटो सॉस चांगला शिजू दिला थोडं शिजत आल्यानंतर एक चमचा मिरची पावडर काली मिरची पावडर मीठ गुळ टाकली व चांगलं ढवळून घेतलं मिक्स केले दोन चमचे लिंबाचा रस घातला आता आपला टोमॅटो सॉस तयार झालेला आहे थंड होऊ दिला.
एका बाऊलमध्ये काढून घेतला व चांगलं थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवला घरच्या घरी छान बाजार च्या सारखा नॅचरल कलर फुल टोमॅटो सॉस टोमॅटो केचप तयार झालेला आहे