team jeevandeep 02/04/2025 pak-kruti Share
एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर घ्यावा. त्यात मीठ आणि पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यावे.
दुसऱ्या भांड्यात उकडलेले बटाटे, लसूण पेस्ट, काळी मिरी आणि थो़डे मीठ टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
आता पीठ लाटून त्याचे 4 ते 5 गोल करून त्याच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.
आता यात मिश्रण भरावे. तुम्हाला हवे असल्यास इतर भाज्यादेखील त्यात भरू शकता.
तयार मोमोज 10 मिनिटे वाफवून घ्यावीत.
आता मोमाज सोया सॉस आणि मिरची सॉससोबत सर्व्ह करावेत.