team jeevandeep 02/03/2025 pak-kruti Share
प्रथम एका पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यात खिसलेले सुकं खोबरे भाजून नंतर त्यात ओलं खोबरे भाजून घ्या. मग तेलात कांदा लसूण चांगले भाजून हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात काढून त्यात धणे कोथिंबीर थोडे जीरे पाणी टाकून वाटप करुन घ्या.
छोटी वांगी धुऊन देठ न काढता किंवा देठ काढून भरल्या वांग्याप्रमाणे चिरावी. मीठ टाकलेल्या पाण्यात टाकावी. नंतर ती वांगी पाण्यातून काढून वांग्यात बनवलेला कांदा खोबरे वाटणं, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट,मीठ एकत्र करून ते मिश्रण भरावे.
आता ग्रेव्ही साठी एका कढईत ३-४ चमचे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता जीरे मोहरी हिंगाची फोडणी देऊन त्यात एक मोठा चिरलेला कांदा परतवून त्यात टोमॅटो पेस्ट टाकून लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ घालून हे मिश्रण चांगले तेलात परतवून घेणे. आता चांगले तेल सुटले की त्या त भरलेली वांगी सोडून त्यावर थोडे पाणी सोडून झाकण ठेवा. आता १० मिनिटे वांगी चांगली शिजली की त्यात वरून थोडा शेंगदाण्याचा कूट घालून ग्रेव्ही थोडी चमच्याने हलवून पुन्हा झाकण ठेवून ५-१० मिनिटे शिजू दया.
आता सजावटीसाठी वरून थोडी कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी किंवा भाताबरोबर सव्हऀ करा.