चिज पाेटॅटाे
team jeevandeep
31/03/2025
pak-kruti
Share
साहित्य-
4 मध्यम बटाटे (उकळून सोलून कापलेले)
1 कप चीज ( किसून घेतलेले )
1 चमचा मैदा
2 चमचे कॉर्नफ्लोअर
1 चमचा मिरीपूड
1 चमचा लाल तिखट
1 चमचा हर्ब्स (मिक्स हर्ब्स किंवा ऑरगॅनिक
1 चमचा लसूण पावडर
मीठ चवीनुसार
तेल (तळण्यासाठी)
कृती-
- उकडलेल्या बटाट्यांचे लहान चौकोनी तुकडे करा.
- एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मिरीपूड, लाल तिखट, हर्ब्स, लसूण पावडर आणि मीठ घाला.
- आता थोडं पाणी घालून मिक्स करा. मिश्रण थोडं घट्टसर करा.
- बटाटे कोट करण्यासाठी बटाट्याचे तुकडे तयार केलेल्या मिश्रणात व्यवस्थित घोळवा, जेणेकरून त्यावर मिश्रणाचा कोट तयार होईल.
- एका पॅनमध्ये तेल गरम करा
- मिश्रणात कोट केलेले बटाटे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- तळल्यावर टिश्यूवर काढून अतिरिक्त तेल काढून घ्या.
- गरम बटाट्यावर ग्रेट केलेले चीज चांगले मिक्स करून
- वरून थोडे हर्ब्स आणि मिरीपूड घाला.
- गरमागरम सर्व्ह करा.