Visitors: 390335
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कोबी – बटाटा कटलेट

  Team jeevandeep       01/03/2025      pak-kruti    Share


patis 

साहित्य 

  • किसलेला कोबी - 1 कप
  • उकडलेले बटाटे - 2 ते 3
  • लाल लिखट - 1 चमचा
  • हळद - अर्धा चमचा
  • धणे पूड - अर्धा चमचा
  • जिरे पूड - अर्धा चमचा
  • तांदळाचे पीठ - 2 चमचे
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मैदा - 1 चमचा
  • पाणी
  • ब्रेड क्रम्प्स
  • तेल
  • मीठ - चवीनुसार

कृती 

  1. एका भांड्यात एक कप किसलेला कोबी घ्यावा, त्यात पाणी नसेल याची खात्री करावी.
  2. यानंतर त्यात दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे स्मॅश करावेत.
  3. यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा.
  4. आता तयार पीठाचे हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्यावेत.
  5. तयार कटलेट मैद्याच्या मिश्रणात घोळवावे.
  6. यानंतर कटलेट ब्रेड क्रम्प्समध्ये घोळवून डिप फ्राय करून तळून घ्यावेत.
  7. तुमचे झटपट तयार होणारे कोबी -बटाटा कटलेट तयार झाले आहेत.
+