Visitors: 226395
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी माहिती

  team jeevandeep      29/04/2025      mahila vishesh    Share


आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपला वेग इतका वाढलाय की आपल्या त्वचेकडे बघायला वेळच उरत नाही. पण खरं पाहिलं तर, सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी थोडीशी काळजी घेणं फार आवश्यक आहे.

आपल्याला चमकदार त्वचा हवी असते, आणि त्यासाठी आपण बाजारातले महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पण हे प्रॉडक्ट्स खरंच आपल्या त्वचेला योग्य आहेत का, हा विचार करणं महत्त्वाचं आहे. शिवाय, स्किन केअरसाठी योग्य वेळ कोणती सकाळ की रात्र याचे फायदे काय आहेत, हे जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे.

सकाळी

सकाळी आपण ऑफिस, कॉलेज किंवा बाहेरच्या कामांसाठी घराबाहेर पडतो. यावेळी त्वचेला धूळ, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे सकाळी स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे, पण दिवसभर धूळमुळे त्वचा पुन्हा डल आणि कोरडी होऊ शकते. यासाठी सकाळच्या वेळी फेसवॉशने चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचा आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. जर एक्नेचा त्रास असेल, तर सौम्य सीरम वापरू शकता.

रात्री झोपताना

रात्री आपण घरी असतो आणि आपली त्वचा रिलॅक्स मोडमध्ये असते. यावेळी स्किन आपोआप रिपेअर होत असते, त्यामुळे रात्री स्किन केअर करणं जास्त फायदेशीर मानलं जातं. झोपण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा आणि नंतर स्किन टाइपनुसार फेस ऑइल लावून हलका मसाज करा. यामुळे त्वचेला चमक येते आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. यासोबतच आय क्रीम लावल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.

रात्री स्किन केअरचे फायदे

1. वेळ मिळतो रात्री आपली त्वचा रिलॅक्स मोडमध्ये असते. दिवसभर धूळ आणि प्रदूषणामुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ आणि आरोग्यदायी होण्यासाठी यावेळी योग्य काळजी घेतली तर त्वचेचं आरोग्य सुधारतं.

2. एक्नेपासून दिलासा मिळतो जर तुमच्या त्वचेला एक्नेचा त्रास असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावल्यास सूज कमी होऊ शकते आणि त्वचा नितळ होते.

3. ओठांची काळजी रात्री झोपण्यापूर्वी लिप बाम किंवा नारळाचं तेल ओठांवर लावल्यास ओठ फुटण्याचा त्रास कमी होतो.

4. चेहऱ्यावर येतो नैसर्गिक तेज झोपण्यापूर्वी चेहरा क्लींझरने स्वच्छ करायला विसरू नका. जर मेकअप लावलेला असेल, तर तो पूर्णपणे काढून टाका. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि मुरूमांची शक्यता कमी होते.

 

+