team jeevandeep 04/02/2025 mahila vishesh Share
नऊवारी साडी
कितीही आधुनिक अर्थात मॉर्डर्न कपडे घातले तरीही साडीची फॅशन आणि महिलांचे साडी प्रेम कधीच कमी होणार नाही. लग्नसराईसाठी साड्यांचे वेगवेगळे प्रकार घेतले जातात. त्यातही लग्न, मुंज, गुढीपाडवा, दिवाळी असे सणसमारंभ असल्यावर नऊवारी साडीला तर अधिक महत्त्व प्राप्त होते.
नऊवारी साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलीचा तोराच काही वेगळा असतो. सौंदर्याची खाण भासावी अशी जणू प्रत्येक मुलगी नऊवारी साडीमध्ये शोभून दिसते.
1. परिपूर्ण सौंदर्याची व्याख्या म्हणजे नऊवारी साडी, सौंदर्य खुलविते भारी.
2. कितीही आधुनिक कपडे घातले तरीही नऊवारीची शान कोणत्याच कपड्यात आणता येत नाही
3. नऊवारी म्हणजे महाराष्ट्राची आन, बान, शान आणि अभिमान !
4. परदेशातही देशी फिलींग देणारा वेष म्हणजे नऊवारी साडी!
5. केवळ अंगावर घालण्यासाठी कापड नाही, तर नारी शक्तीचा अभिमान अशी ही नऊवारी साडी!
6. माझ्या चेहऱ्यावर आलेल्या तेजासाठी जर कोणी कारणीभूत असेल तर ती आहे ही नऊवारी साडी!
7. कोणत्याही मॉर्डर्न लुकला लाजवेल असा जर कोणता लुक असेल तर तो म्हणजे हा नऊवारी साडीचा!
8. नऊवारी नेसून मिरविण्याचा आनंद दुसऱ्या कशाच नाही
9. सगळ्यात भारी लुक म्हणजे नऊवारी साडीतला लुक!
10. मी कोण आहे, हे दाखविण्याचा सर्वात सुंदर पर्याय म्हणजे नऊवारी साडी!
1. नऊवारी साडी म्हणजे मराठ्यांचा अभिमान!
2. नऊवारी साडी नेसणं म्हणजे सौंदर्याचं भरभरून कौतुक आणि मराठी असण्याची शान!
3. सौंदर्य खुलविण्यासाठी जर काही शोधत असाल तर नेसा नऊवारी साडी!
4. खऱ्या सौंदर्याचा लुक हा नऊवारी साडी नेसल्यावरच येतो!
5. खरा तोरा मिरवायचा असेल तर शोभून दिसेल नऊवारी साडी!
6. सौंदर्याचा साज, साड्यांचा माज जर कोणी असेल तर ती म्हणजे नऊवारी साडी!
7. लाख मोलाच्या दागिन्यांना येते शोभा, अशी जर कोणी असेल तर ती म्हणजे महाराष्ट्रीयन नऊवारी साडी!
8. सौंदर्यात घालायची असेल भर, तर नऊवारी साडीवर असेल जर, तुम्ही कराल अनेकांची मनं सर!
9. एक वेगळाच आत्मविश्वास मिळवून देते नऊवारी साडी!
10. नऊवारी साडी म्हणजे केवळ कापड नाही, तर ती एक भावना आहे