team jeevandeep 08/03/2025 mahatvachya-batmya Share
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान आवास योजनेतील २० लाख घरांना मोफत सौरऊर्जा पुरविली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्यातील ७० टक्के घरगुती ग्राहक हे दरमहा ० ते १०० युनिट वीज वापरतात. नवीन योजनेतून ही कुटुंबे घरावर सोलर पॅनल बसवू शकतील व वीज बिलमुक्त होतील. १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी केले जात आहेत. यामुळे ९५ टक्के घरगुती ग्राहकांना दर कपातीचा थेट लाभ मिळेल. ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले, तर दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत मिळेल, असे ते म्हणाले.