team jeevandeep 17/02/2025 mahatvachya-batmya Share
ठाणे :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व लाईट हाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्दमाने दि.20 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता डोंबिवली लाईट हाऊस, महावीर हाईटस, पाणी टाकी जवळ, वीर सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), जि.ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इ. या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
तरी सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी कळविले आहे.