team jeevandeep 05/05/2025 mahatvachya-batmya Share
दि. ०५ (जिल्हा परिषद, ठाणे) –
जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत भारत सरकारच्या राष्ट्रीय पशुधन योजनेचा (National Livestock Mission) प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. ही योजना पशुपालकांना व्यवसायिक दृष्टिकोनातून सक्षम बनविण्याचा उद्देश समोर ठेवून राबविण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे उपयोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे:
1. पशुधन विकासासाठी वित्तीय सहाय्य
– कुक्कुटपालन, शेळीपालन, डुक्करपालन, दुभती जनावरे अशा विविध घटकांसाठी आर्थिक अनुदान व सवलती उपलब्ध.
– लाभार्थ्यांनी स्वत:च्या मालकीची जमीन अथवा इतर आवश्यक सुविधा दाखवणे बंधनकारक.
2. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
– अर्ज ah.mahabms.com या पोर्टलवरून सादर करता येतील.
– अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, प्रकल्प अहवाल इ.) अपलोड करणे आवश्यक आहे.
– अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीने पार पडणार आहे.
3. योजनेच्या प्रचारासाठी विशेष प्रयत्न
– गावपातळीवर जनजागृती मोहीम, पोस्टर व बॅनर्सद्वारे माहिती प्रसार.
– कृषी मेळावे, पशुपालक मेळावे आयोजित करून थेट संवाद.
– ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन.
4. लाभार्थ्यांची निवड व प्राधान्य
– अल्पभूधारक, महिला, अनुसूचित जाती-जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य.
– निवड प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक मार्गाने होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात पशुधन व्यवसायासाठी अनेक लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असून, अधिकाधिक पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समिर तोडणकर यांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://ah.mahabms.com
मोबाईल अॅप: AH-MAHABMS (Google Play Store वर उपलब्ध)