team jeevandeep 29/03/2025 mahatvachya-batmya Share
दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे)-
ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सहसंचालक आरोग्य सेवा (क्षय व कुष्ठरोग) पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्हा क्षयरोग अधिकारी ठाणे डॉ. ए. एस. मुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ मार्च, २०२५ रोजी येथे कोन गावं श्रीप्रसाद हॉटेल, भिवंडी येथे ४५ डॉक्टारांची व दि. २७ मार्च, २०२५ रोजी एस ३ हॉटेल, अंबरनाथ बदलापूर रोड, चिखली, अंबरनाथ येथे ६५ डॉक्टरांची कार्यशाळा डॉक्टर्स फॉर यु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अविनाश जाधव यांनी क्षयरोग कार्यक्रमातील नवीन उपचार पद्धती यावर प्रशिक्षण घेतले व डॉ. राजाभाऊ येवले यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात (NTEP) खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचा सहभाग व त्याचे महत्त्व यावर प्रशिक्षण दिले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. एस. मुंजाळ यांनी प्रस्ताविक करताना कार्यशाळा दररोजच्या कामकाजात महत्त्वाची भुमिका बजावणार असल्याचे सांगितले.
यावेळी भिवंडी आय. एम. ए संघटनेचे अध्यक्ष डॉ. भूषण कुलकर्णी, अंबरनाथ आय. एम. ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश राठोड, डॉ. हरेश लापसिया, जनरल प्रॅक्टिशनर संघटनेचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र गायकवाड, छातीरोग तज्ञ डॉ. रेखा जाजो, प्याथोलोजिस्ट डॉ. अनिरुद्ध रणदिवे, डॉ. समीर कुलकर्णी, डॉक्टर्स फॉर यु संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक संकेत गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी ठाणे डॉ. तरुलता धानके यांनी आभार व्यक्त केले. CME कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पी. पी. एम. समन्वयक हेमंत सपकाळ यांनी डॉक्टर्स फॉर यु संस्थे सोबत समन्वयाने कार्यक्रमाचे आयोजन उत्तम केले, तसेच वरिष्ठ उपचार व लाबोरेटरी पर्यवेक्षक सतीश देशपांडे व शामराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. क्षयरोग पथक भिवंडी व अंबरनाथ येथील सर्व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागाने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.