Visitors: 227845
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

यंदाही धूलिवंदन उत्सवाला गालबोट

  team jeevandeep      15/03/2025      mahatvachya-batmya    Share


 

मुंबई, ठाण्यात धुळवडीचा बेरंग, उल्हासनदीत सहा जण, भातसा नदीत एकजण बुडाले, ५२जण वेगवेगळ्या प्रकारात जखमी,!

कल्याण:

होळीच्या उत्साहानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात रंगपंचमीचा रंग खेळल्यानंतर तो रंग काढण्यासाठी उल्हास नदीत गेलेल्या दहावीच्या ८विद्यार्थ्यांपैकी ४विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, याच नदीत वसत जवळ २जण बुडाले, भातसा नदीत खडवली येथे एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी झाला, तर मुंबई ठाण्यात होळी आणि धुळवडीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारात सुमारे५२जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही होळी धुलीवंदनला अशा घटनाचे गालबोट लागले.

  मुंबई, ठाण्यात होळी  धुलीवंदन/रंगपंचमी साजरी केली जाते, हे सर्व नंतर रंग धुण्यासाठी तलाव, धरण किंवा नदीमध्ये जातात, असेच बदलापूर चामटोली परिसरातील ८विद्यार्थी रंग काढण्यासाठी उल्हासनदीत उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला परंतु काही उपयोग झाला नाही,

,, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, यामध्ये आर्यन मेदर(वय१५वर्षे)ओमसिंग तोमर(१५)सिध्दार्थ सिंग(१६)आणि आर्यनसिंग(१६वर्षे)अशी त्यांची नावे आहेत, यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, खडवली जवळील भातसा नदीत राजा जाधव(वय४७वर्षे)हे बुडाले, तर उल्हासनदीत आपटी बंधाऱ्याजवळ वसत ग्रामपंचायत हद्दीत२जण बुडाले, यातील एकाला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले, परंतु दुसरा नासीर मेहबूब शेख(वय२६वर्षे)रा मेटलनगर, अंबरनाथ बुडताना विडिओ त दिसतो, मात्र त्याचा मृतदेह अद्यापही सापडला नाही, आपटी आदिवासी वाडितील करन जाधव, राम वाघे, मुरलीधर जाधव यांनी याचा शोध घेतला पण नाशीर ची बाँडी सापडली नाही.

हे झाले रंग धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या लोकांचे, परंतु जे पाण्यात न उतरता, एकमेकांना पाण्याचे फुगे, मारणे, रस्ता अपघात, किंवा इतर अनेक कारणांमुळे मुंबई ठाण्यात सुमारे५२जण किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी झाले, त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होळी आणि धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागले,,

+