team jeevandeep 08/05/2025 mahatvachya-batmya Share
मुरबाड-प्रतिनिधी :
मुरबाड नगरपंचायत हद्दीतील पथदिवे (स्ट्रीट लाईट) गेले अनेक महिने बंद आहेत. यासंदर्भात जागरूक नागरिकांनी मुरबाड नगरपंचायतच्या निदर्शनास आणून देखील नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. उंच खांबावरील पथ दिवे दुरुस्तीसाठी वाहन नसल्याची कारणे नागरिकांना मिळत होती.
यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या सहकार्याने मागिल पंधरा दिवसांपूर्वी ओझेन हायड्रोलिक विद्युत वाहन खरेदी करून त्याचे लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. वाहनाची व्यवस्था झाली असताना सुद्धा मुरबाड नगरपंचायत याबाबतीत उदासिन असल्याचे दिसत असल्याने शहरातील स्थानिक नागरिक मात्र नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान यासंदर्भात या विभागाच्या प्रमुख वैशाली देशमुख मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता रोड लाईट दुरूस्ती साठी लागणारे साहित्य उपलब्ध नव्हते त्याची मागणी केलेली आहे ते आल्यावर तात्काळ रोडलाईट दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.