Visitors: 228042
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

  team jeevandeep      28/02/2025      mahatvachya-batmya    Share


दै.ठाणे जीवनदीप वार्ता 

पालघर/ मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात सदर ७ कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये

१. वेबसाईट,

२. सुकर जीवनमान,

३. स्वच्छता,

४. तक्रार निवारण,

५. कार्यालयीन सोई सुविधा,

६. आर्थिक व औद्यागिक गुंतवणुकीस प्रोत्साहन,

७. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी विषय आहेत. पालघर जिल्हा पोलीस दलाने पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतीमान करताना वेबसाईट अद्ययावत करून User Friendly बनवली, नागरिकांसाठी Chat Box सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम, Al based Chat Bot, स्वच्छता मोहिम, तक्रार निवारण दिन, ई-ऑफिस कार्यप्रणाली, Visitor Management System, कार्यालयीन कामकाजामध्ये AI चा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय अॅप्लीकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत.

   ७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या ५० दिवसाच्या आढाव्यात पोलीस विभागातील पालघर जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्या अनुषंगाने दि.२७/०२/२०२५ रोजी सह्याद्री अतिथी गृह, मुंबई या ठिकाणी मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत सादरीकरण पार पडले. सदरवेळी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे. सदरचा ७ कलमी कार्यक्रम हा  बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर,  विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या राबविला आहे.

+