team jeevandeep 05/04/2025 mahatvachya-batmya Share
सुरेंद्र पाटील याने एका घटस्फोटीत महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. घटस्फोटीत महिलेलाही आमिष दाखवून अतिप्रसंग केल्याची माहिती आहे.
डोंबिवलीतील रीलस्टार सुरेंद्र पाटील याचं आणखी एक दुष्कृत्य समोर आलंय. सुरेंद्र पाटील याच्या गाळयात व्यवसाय करणाऱ्या घटस्फोटीत महिलेवरच सुरेंद्र पाटीलनं बलात्कार केलाय. थकलेले भाडे देऊ नको आणि तुझी मशिनरी परत करतो असे आमिष दाखवत सुरेंद्र पाटील याने पिडीतेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेंद्र पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.