team jeevandeep 02/05/2025 mahatvachya-batmya Share
मुरबाड-प्रतिनिधी :
सन 2024 -25 या वर्षातील 20% जिल्हा परिषद सेसफंड अंतर्गत मागासवर्गीय वस्तीसाठी व मागासवर्गीय लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप मुरबाड पंचायत समिती येथिल सभागृहात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यामध्ये भजनासाठी 6 वाद्यवृंद साहित्य, 19 समाजमंदिराना भांडी, 10 डिजे संच व 6 समाजमंदिरांना सतरंज्या अशा प्रकारचे साहित्य वाटप आज करण्यात आले.मागिल वर्षी काही तांत्रिक कारणामुळे सेस फंडाचा लाभ तालुक्यातील नागरिकांना मिळाला नाही. परंतु या वर्षी चांगल्या प्रकारे लाभ मिळाला असल्याचे आमदार कथोरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले. भजन किंवा डि.जे. संचातून काही लोकांना रोजगार मिळू शकतो.साहित्याची योग्य निगा राखा तालुक्यात अनेक लहान मुलांना गायनाची व वादनाची आवड आहे, संगित शिकत आहेत. वादक व गायनासाठी लवकरच तालुक्याला संगित कला भवन उभारण्याचा आपला मानस आहे.महाराष्ट्राचा आवाज महेश कंटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भवन राहणार असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी केले.तर या कार्यक्रमासाठी नितीन मोहपे, दिपक पवार, सुरेश बांगर,स्वरा चौधरी, जितेंद्र भावार्थे, अनिल घरत, दिनेश ऊघडे,जयवंत कराळे, सचिन चौधरी,संजय पवार, मयुर एगडे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.