team jeevandeep 08/05/2025 mahatvachya-batmya Share
डोंबिवली :
भारतीय वायूसेनेने हवाई हल्ला करत पाक व्यस्त काश्मीर मधील अतिरेक्यांच्या 9 तळावर अतिरेक्यांना यमसधनी धाडले.भारत सरकारने बदला घेतला असून ' 'ये ते सिर्फ ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे'.. असं म्हणत भारतीय जनता पार्टीने डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक येथे नागरिकांना पेढे वाटत जल्लोष केला.
भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, माजी नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेढणेकर, माजी नगरसेविका खुशबु चौधरी,प्रकाश ( बाळा ) पवार, राजू शेख, रविसिंग ठाकुर, वर्षा परमार यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तान मध्ये घुसून ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले. “ऑपरेशन सिंदूर” च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत भाजपने जल्लोष केला. सरकारला बळ देण्यासाठी डोंबिवलीतील नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटत, फटाके फोडत, व भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पुढे येत एकमेकांना सिंदूर लावले. दहशतवाद व आतंकवादला धडा शिकवल्याबद्दल नरेंद्र मोदींचे यांचे व भारतीय सरकारचे आभार मानतो असे भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे म्हणाले.